अरबाज खान, ललित पंडित, कायनात अरोरा व अन्य तारकांनी केले जियोगुरू अँप चे अनावरण
जियोगुरू चे मुख्य कर्ता-धर्ता सौम्यजीत गांगुली आणि सुकन्या गुप्ता यांनी मुख्य अतिथी अरबाज खान, संगीतकार ललित पंडित, कायनात अरोरा, जॉय सेनगुप्ता, शयंतनी घोष, सीमा सिंह, अरुण बक्शी, अनंग देसाई, पीयूष मुंशी, गायक अनीक धर, अभय जोधपुरकर, मेघना मिश्रा यांसारख्या कलाकारांच्या उपस्थितीत जियोगुरु अँपचे अनावरण करण्यात आले.
जियोगुरू एंटरटेनमेंटचे चार नवीन शोज लॉन्च केले गेले, ज्यामध्ये टॅलेंट हंट, सौंदर्य प्रतियोगिता आणि वेब सीरीजचा सहभाग आहे.
जियो सिंगिंग स्टार एक नवीन टॅलेंट हंट शो आहे, ज्यामध्ये मनोरंजन क्षेत्राशी संबंधित कलाकारांना आपली कला दाखवण्याची संधी मिळेल. मग ते संगीत क्षेत्राशी जोडलेले असो किंवा फीचर फिल्म अथवा शॉर्ट फिल्मशी, सगळ्यांना ह्यात सहभाग घेण्याची संधी दिली जाणार आहे. जियोगुरूचे सौम्यजीत गांगुली आणि सुकन्या गुप्ता म्हणाले की, "आम्ही नेहमीच नवीन नवीन प्रतिभांच्या शोधात राहिलो आहोत आणि ह्यासाठी आम्ही एका अशा प्रतियोगितेचे आयोजन करत आहोत ज्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही. इच्छुक आपले गाणे रेकॉर्ड करून अपलोड करु शकतात." विभिन्न स्थरावर त्यांना जज केल्यावर आणि त्यांच्या वोट्स गणनेला लक्षात ठेवून २४ स्पर्धकांना निवडले जाईल, ज्यांना मुख्य अतिथि - अभिनेता अरबाज खान आणि संगीतकार ललित पंडित यांच्या समोर परफॉर्म करण्याची संधी मिळेल. इतकेच नाही तर, मेघना मिश्रा आणि अभय जोधपुरकर स्पर्धकांचे मेंटॉर असतील आणि या शोचे होस्ट अनीक धर असतील.
अन्य शोजच्या तुलनेत जियो किंग आणि क्वीन मध्ये एक आगळी-वेगळी सौंदर्य स्पर्धा पाहायला मिळेल. जियोगुरू द्वारा आयोजित ही सौंदर्य रिएलिटी शो स्पर्धा तीन चरणात विभागली गेली आहे. ह्या हटके अश्या ग्लैमर हंट स्पर्धेबद्दल अँप मालक सांगतात की, "आम्ही कथाकथित बाह्य सौंदर्याला मानत नाही. अश्यावेळी शारीरिक रूप रंग आमच्यासाठी इतके महत्वाचे नाहीत. सगळ्यात महत्वाचे आहे मनाची सुंदरता ज्याद्वारे त्यांचे विचार ते कसे मांडतात. अश्या व्यक्तीच्या जीवनामध्ये यशाच्या शिखरापर्यंत पोचण्यात कोणतेही अडथळे येऊ शकत नाही. मुख्य बाब म्हणजे अरबाज खान आणि कायनात अरोरा ह्या कार्यक्रमाचे मुख्य जज आहेत.
'एम फॉर मॉम' एक कौटुंबिक विषयावर आधारित वेब सीरीज आहे, ही वेब सिरीज आई आणि मुलाच्या नात्यावर आधारित असलेली कथा मांडते. कथा अश्या एका मुलाची जो आपल्या आईचा द्वेष करतो, परंतु त्याचे त्याच्या पित्याच्या मैत्रिणीशी जवळीकतेचे नाते असते. त्याच्या एकटेपणात ती महिला नेहमीच त्याची साथ देते. मुलगा त्याच्या आईशी कितपत द्वेष करतो आणि कोणत्या स्थरावर जातो त्याचा हा द्वेष हे जाणून घेण्यासाठी तुम्हला ही वेबसिरीज पाहावी लागेल. ह्या कथेच्या मुख्य भूमिकेत जॉय सेनगुप्ता, शयंतनी घोष, पियाली मुंशी और कृष गुप्ता आहेत.एम फॉर मॉम या वेब सिरीजचे दिग्दर्शन जीत चक्रवर्ती यांनी केले आहे तर सब्यसाची मंडल यांनी असिस्टंट दिग्दर्शकाचे काम केले आहे. सुकन्या गुप्ता यांनी याची कथा लिहली आहे आणि वेबसिरीसच्या क्रिएटिव डिरेक्शनचा कार्यभार देखील त्याच सांभाळत आहेत. पिनाकी बोस यांनी ह्या कथेला संगीत बद्ध केले आहे .
जियोगुरू एंटरटेनमेंट अँप चे पुढील सादरीकरण 'भाभीजी मैं आऊं?' चे संगीत आणि ट्रेलर नामांकित लोकांच्या उपस्थितीत लॉन्च केले गेले.
सिने स्टार्स च्या उपस्तिथीत, प्रियंका सिंह द्वारा गायले आणि एस. कुमार द्वारा संगीतबद्ध केले गेलेले भोजपुरी आइटम नंबर 'बारा बजे आना' हे गाणे लॉन्च केले गेले. ह्यानंतर एक हिंदी गाण 'नाचेंगे सारी रात' लाँच केलं गेलं, हे गीत बांग्ला रॅपर तन्मय साधक ने गायले आणि कम्पोज केलेले आहे. ह्या चित्रपटाची कथा दोन अविवाहहीत जोडप्याच्या जवळपास फिरते. एक विवाहित पुरुष 'भाभीजी' च्या प्रति आकर्षित होतात. ह्या चित्रपटाच्या कथेचा हेतू लोकांना हसवत त्यांचे भरपूर मनोरंजन करण्याचा आहे. ह्याची कथा, स्क्रीनप्ले आणि निर्देशन सौम्यजीत यांनी केले आहे. सगळ्या रोचक ट्विस्ट आणि वळणानंतर एका अनपेक्षित रीतीने ह्या कथेची समाप्ती होते.
ह्या वेबसिरीजद्वारे भोजपुरी चित्रपटाची प्रख्यात आयटम क्वीन सीमा सिंह पहिल्यांदा एखाद्या वेबसिरीज मध्ये एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रेम सिंह आणि अरेया यांनी देखील यामध्ये मुख्य भूमिका बजावली आहे, इतकेच नाही तर आनंद बख्शी यांनी वॉइस ओव्हर दिला आहे.
जियोगुरू अँपवर दर्शक विभिन्न तर्हेच्या वेब सीरीज, चित्रपट आणि वेवेगळ्या तर्हेच्या एक्सक्लूसिव शोज पाहू शकतात. नुकतेच अँप तर्फे दर्शकांसाठी सब्स्क्रिप़्शन प्लॅन जारी करण्यात आले आहेत, ह्या प्लॅनच्या अंतर्गत सब्स्क्राइब करणारे दर्शक फक्त ७९ रुपयात ह्याचा लाभ घेऊ शकतात. जियोगुरू अँप वर ड्रामा, हॉरर, थ्रिलर आणि कॉमेडी यांसारख्या वेगवेगळ्या तऱ्हेचा कन्टेन्ट उपलब्ध आहे. जियोगुरू एप्लीकेशन हे iOS वापरकर्त्यांसाठी अँप स्टोरमध्ये आणि ऐंड्रायड वापरकर्त्यांसाठी गुगल प्ले स्टोर मध्ये उपलब्ध आहे
Comments
Post a Comment