माझ्या मुलांना विश्वास नाही की मी स्क्रीनवर रामायणात आहे: स्वप्निल जोशी


उत्तर रामायण टीआरपी चार्टमध्ये अव्वल असल्याने अभिनेता स्वप्निल जोशी पौराणिक धारावाहिकांच्या पुनः प्रसारणावर खूश आहेत!


कोरोना व्हायरस (कोविड -१९) या ह्या विषाणूने संपूर्ण जग हादरवून टाकले आहे आणि सर्वांच्या जीवनावर त्यामुळे वाईट परिणाम झाला आहे. भारतीय करमणूक उद्योग यामध्ये  वेगळा नाही! सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लॉकडाऊन दरम्यान पौराणिक  धारावाहिक  कार्यक्रमांचे पुनरागमन झाले असून, प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणी जणू पुन्हा उजागर  झाल्या आहेत. हे कार्यक्रम पुन्हा चालविण्याच्या या निर्णयाला देशभरातील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद आहे.  इतर बर्याच जणांप्रमाणे अभिनेता स्वप्निल जोशी यांनीही या धारावाहिकांचे पुन:  प्रसारण पाहत आहेत. खरं तर, अभिनेत्याचे दोन लोकप्रिय धारावाहिक 'उत्तर रामायण' आणि 'श्री कृष्णा' देखील  घरोघरी पुन्हा टेलेव्हीजन वर सुरु झाले आहेत.

सर्व प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जाऊन स्वप्निल जोशी यांनी स्वत: चे कला कौशल्य सिद्ध केले आणि सिनेसृष्टीच्या विश्वातही आपला ठसा उमटविला आहे! भारतीय चित्रपटातील लोकप्रिय बालकलाकारापासून ते मराठी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या चॉकलेट बॉयपर्यंत स्वप्निल जोशी यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अलीकडेच 'समांतर' नामक वेब-सीरिजने वेब क्षेत्रात आपली धमाकेदार प्रवेश केला.

पौराणिक धारावाहिकांच्या पुनः प्रसारणावर बोलताना स्वप्निल जोशी यांनी असे म्हटले आहे की, “लॉकडाऊनमुळे लोकांवर मोठा फटका बसला आहे परंतु  आता सर्वांना शांत होण्याची गरज आहे. आणि हि शांती त्यांना रामायण, महाभारत आणि श्रीकृष्णासारख्या कार्यक्रमांखेरीज नाही मिळू शकत. ”  तीन आयकॉनिक शो पैकी अभिनेत्याने दोन धारावाहिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत; उत्तर रामायणातील लव्ह आणि कुश मध्ये कुश चे पात्र आणि श्रीकृष्णा या कार्यक्रमात कृष्ण हे पात्र त्यांनी साकारले. "जगात असे कोणीही नाही की ज्याला भगवान राम आणि कृष्णाबद्दल माहिती नाही."

हे केवळ धारावाहिक नसून बऱ्याच लोकांच्या बालपणीचा आणि संस्कृतीचा एक भाग असल्याचे सांगीतले. इतकेच नाही तर स्वप्निल यांचा असा विश्वास आहे की जात किंवा धर्म काहीही असो, रामायण आणि महाभारत हे असे धारावाहिक आहेत की जे प्रत्येक भारतीय पाहत आहे  आणि त्याचा आनंद घेत आहे! स्वप्निल जोशी शेवटी म्हणाले, “प्रत्येकासाठी त्यांचे बालपण पुन्हा जगण्याची ही एक अप्रतिम संधी आहे! आणि यात मी हि सामील आहे. व्यक्तिशः, मी देखील माझ्या मुलांबरोबर पुनः प्रसारणाचा आनंद घेत आहे. ” विशेष म्हणजे स्वप्निलने हे उघड केले की त्याची मुले त्याला शोमध्ये ओळखत नाहीत! “मी स्क्रीनवर असल्याचा विश्वास ठेवण्यास त्यांनी नकार दिला. त्यावेळी मी ९ किंवा १० वर्षांचा होतो."

Comments

Popular posts from this blog

Soulful Guzara Tugs At Your Heartstrings

Dhananjay Datar’s Masala King comes to India, launched by Karisma Kapoor