दिग्दर्शक अस्लम खान यांचा 'फिट्टे मुह' मध्ये विन राणा आणि अँजेला क्रिस्लिंझकी दिसतील एकत्र

ईश्ना प्रोडक्शन्स अँड इंटरटेंनमेंट प्रस्तुत हिंदी-पंजाबी हिपहॉप फ्युजन शैलीतील 'फिट्टे मुहह्या नवीन गाण्याचे निर्माते अनुराधा सिंग आणि प्रितेश झटाकिया असून सह-निर्मिती केली आहेदानिश काक यांनी  संगीत व्हिडिओची निर्मिती फ्यूजन इव्हेंट प्लॅनिंग याच्या अंतर्गत केलेली आहे. 'नयी पडोसन', 'वेलकम बॅक', 'रफ़ूचक्करआणि सोनी सब शो 'दिल दे के देखोप्रसिद्धी प्राप्त अस्लम खान यांनी हा म्युजिक व्हिडिओ दिग्दर्शित केला आहे.
पुरस्कार प्राप्त गायिका आणि 'पल्लो लटकेप्रसिद्धी प्राप्त ज्योतिका तंगरी आणि इंडो-कॅनेडियन हिप-हॉप शैलीत खळबळी उठवणारा इश्क बेक्टर यांनी एकत्र या गाण्याला स्वरबद्ध केले आहेडीएच हार्मोनी यांनी 'फिट्टे मुहला संगीत दिले आहे आणि त्यांच्या ह्या संगीत व्हिडिओमध्ये भारतीय अभिनेता-मॉडेल ‘१९२१’ प्रसिद्धी अँजेला क्रिस्लिंझकी आणि लोकप्रिय टीव्ही स्टार विन राणाची एकत्र दिसणार आहेत.
स्टार प्लस वाहिनीच्या 'महाभारतआणि 'एक हसीना थीयासारख्या कार्यक्रमांनी भारतीय टेलेव्हीजनवर आपलया प्रतिभेचा ठसा उमटविलेला विन राणा सध्या झी टीव्ही वाहिनीच्या 'कुमकुम भाग्य'  या शोमध्ये पूरब खन्नाची भूमिका आणि कलर्स टीव्हीच्या 'कवच महाशिवरात्रीह्या एक अलौकिक थ्रिलर मालिकेमध्ये कपिल ची भूमिका साकारत आहे.
अँजेला क्रिस्लिंझकी आणि विन राणा यांच्याबरोबर काम  करण्याचा अनुभव मांडताना अस्लम खान म्हणाले, “या गाण्याला फक्त अँजेला आणि विनचीच गरज होतीया ट्रॅकवर त्यांनी खरोखर चांगली कामगिरी केली आहेत्यांच्यासमवेत काम करणं हा एक अद्भुत अनुभव होता.”
'फिटे मुहहे अस्लम खान यांचा सहव्वीसावे दिग्दर्शन आहेदिग्दर्शक म्हणून त्यांच्या यशाबद्दल आणि कॅमेरासमोर-मागे काम करण्याबद्दल आपल्याला काय वेगळे वाटते याबद्दल विचारले असता अस्लम खान म्हणतात की, “अधूरे अधूरे एक चार्टबस्टर होतेतसेचऑन-कॅमेरा आणि ऑफ-कॅमेरा बिटबद्दलदोन्ही अनुभव विलक्षण आहेतमला हे कळले कारण मी आता कॅमेर्याच्या मागे काम करत आहेमी स्वतअभिनेता असल्यामुळे दिग्दर्शकाने ज्या सर्व बारीकसारीक गोष्टी काळजी घ्याव्या त्या मला माहीत आहेत आणि त्या मी काळजी पूर्वक सांभाळतो. ” अखेरीस "शेवट चांगला तर सगळं काही चांगलं." म्हणत व्हिडिओ खूप आकर्षक झाला असल्याचे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

Soulful Guzara Tugs At Your Heartstrings

माझ्या मुलांना विश्वास नाही की मी स्क्रीनवर रामायणात आहे: स्वप्निल जोशी

Angela Krislinzki loves the desi Bollywood twist!