पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला गायिका सानिया सईदने ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी‘ गीताने दिली पर्यावरणाचा संदेश
जागतिक पर्यावरण दिनाच्या आदल्या दिवशी गायिका सानिया सईदने ‘ तुझसे नाराज नहीं जिंदगी ‘ गाणे गात पृथ्वी वाचवण्यासाठी वृक्षारोपण करण्याची गरज असल्याचे सांगत वृक्षारोपण केले . आर . डी . बर्मन यांनी गुलजार यांच्या गीताने संगीतबद्ध केलेले लता मंगेशकर यांनी गायलेले मूळ गाणे आज वृक्ष आणि वनस्पती यांच्या रुपाने प्रतिध्वनीत दिसत आहेत . आपले भविष्य यावर अवलंबून असल्याने आपल्याला आपले पर्यावरण जपण्याची गरज आहे , असे यावेळी सानियाने बोलताना सांगितले . " मी लताजींच्या आवाजावर मोठी झाली आहे . त्या माझ्या आदर्श आहेत . मी लताजींना मानवंदना देत आहे आणि मला आशा आहे की ती ऐकून त्यांना आवडेल , लाखो लोकांना प्रेरणा देण्याची शक्ती असल्यामुळे मी हे गाणे निवडले ." असेही सानिया यावेळी म्हणाली .